Ad Code

Responsive Advertisement

New Posts

6/recent/ticker-posts

Naam Marathi Grammar naam aani namache prakar नाम व नामाचे प्रकार

 

नाम व नामाचे प्रकार 

Naam Marathi Grammar

Naam Marathi Grammar


नाम सृष्टीतील कोणत्याही घटकाला दिलेले नाव म्हणजे नाम. नामाचे मुख्य ३ प्रकार आहेत.

सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम 

१. सामान्य नाम   ज्या नामाच्या योगाने जाती किंवा गटाचा बोध होत असेल त्यास सामान्य नाम म्हणतात.

उदा मुलगा, माणूस, ग्रह, तारे, शहर, गाव इत्यादी.

 

सामान्य नामाचे २ प्रकार

१.१. पदार्थ वाचक जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा ग्रम मोजले जातात त्यांना पदार्थ वाचक नाव म्हणतात.

उदा दूध, तेल, पाणी, कापड, गहू, सोने, चांदी इत्यादी.

२.२. समूह वाचक ज्या नामाच्या योगाने समूहाचा बोध होतो त्यास समूह वाचक नाम म्हणतात .

(टीप सामान्य नाम हे जाती वाचक व अनेक वचनी असतात उदा मुलगा)

उदा मोळी, जुडी, ढिगार, कळप, टोळी इत्यादी.

 

२. विशेष नाम  ज्या नामाच्या योगाने विशिष्ट वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम म्हणतात.

उदा शिवाजी, सूर्य, ताजमहाल, पृथ्वी, गोदावरी इत्यादी.

 

( टीप विशेष नाम हे व्यक्ती वाचक व एकवचनी असतात उदा सागर)

 

३. भाव वाचक नाम/धर्म वाचक नाम   ज्या नामाच्या योगाने गुण,धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाव वाचक नाव म्हणतात, ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अश्या नामाला भाव वाचक नाम म्हणतात.

उदा गरिबी, सौंदर्य, शत्रुत्व, गर्व, थकवा इत्यादी.

 

भाव वाचक नामाचे ३ प्रकार

३.१ गुण दर्शक सौंदर्य, प्रामाणिकपणा, चतुराई

३.२ स्तिथी दर्शक गरिबी, श्रीमंती, स्वातंत्र

३.३ कृती दर्शक चोरी, चळवळ, क्रांती

प्रत्यय वापरून तयार झालेले भाव वाचक नामे

य सुंदर सौंदर्य, गंभीर गांभीर्य, शूर शौर्य, नवीन नावीन्य

त्व शत्रू शत्रुत्व, मित्र मित्रत्व, प्रौढ प्रौढत्व, नेता नेतृत्व

 

पण / पणा देव देवपण, बाळ बालपण, शहाणा शहाणपण

ई श्रीमंत श्रीमंती, गरीब गरिबी, गोड गोडी

ता नम्र नम्रता, वीर वीरता, बंधू बंधुता

कि पाटील पाटीलकी, माल मालकी, गाव गावकी

 

गिरी गुलाम गुलामगिरी, दादा दादागिरी, फसवा फसवेगिरी

वा गोड गोडवा, गार गारवा, ओला ओलावा

आई नवल नवलाई, चपळ चपळाई, चतुर चतुराई वी थोर थोरवी

 

A. सामान्यनामाचा विशेषनाम म्हणून उपयोग :

 आमच्या पोपट कालच गावाला गेला. आत्ताच तो नगरहून आला. आमची बेबी नववीत आहे.

 

B. विशेषनामाचा सामान्यनाम म्हणून उपयोग :

 आमची बायको म्हणजे लक्ष्मी. तुमची मुलगी त्राटिकाच दिसते. आईचे सोळा गुरुवारचा व्रत आहे.

 

C. भाववाचक नामांचा विशेषनाम म्हणून उपयोग:

 शांती माझ्या भावाची मुलगी आहे. माधुरी सामना जिंकली. विश्वास परीक्षेत पास झाला.

 

D. धातुसाधित नाम : धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामा प्रमाणे वापर केल्यास त्यास धातुसाधीत नाम म्हणतात.

 

त्याचे वागणे चांगले नाही. ते पाहून मला रडू आले. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे.

 

Post a Comment

2 Comments

Ad Code

Responsive Advertisement