शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF)
![]() |
शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) |
संदर्भ:
१. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/ एसडी-६ मंत्रालय मुंबई दि. १५
मार्च, २०२४ (SQAAF)
२. शासन निर्णय क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/ एसडी - ६ मंत्रालय मुंबई दि. १५
मार्च, २०२४ (SSSA)
३. मा. संचालक सो. SCERT PUNE यांचेकडील मान्य टिपण्णी दि. ०८/०१/२०२५
💥 उपरोक्त संदर्भ क्र.१ नुसार राज्यातील सर्व शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
💥 संदर्भ क्र.२ नुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) निर्मिती करण्यात आलेली आहे.
💥 संदर्भ क्र.३ नुसार सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे स्वयं-मूल्यांकन करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील SQAAF टॅबवर https://scert-data.web.app/ या नावाने स्वयं - मूल्यांकनासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
💥 तरी, सदरील ऑनलाईन लिंकवर माहिती भरणे बाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
💥 तसेच, सदरील लिंक ही दि. २८ फेब्रुवारी, २०२५ रोजी सायं. ०५:०० पर्यत भरण्याची कार्यवाही करावी.
💥 सदरील लिंकमध्ये माहिती भरण्याची कार्यवाही खाली दिलेल्या सूचनानुसार विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावी.
शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखड्याची (SQAAF) सविस्तर माहितीसाठी खालील पत्र डाऊनलोड करा .
![]() |
(SQAAF) शासन निर्णय |
0 Comments