मराठी व्याकरण
लिंग
💥‘लिंग’ या घटकाचा अभ्यास करण्याअगोदर आपण खालील वाक्यांचा अभ्यास करू.
१. प्रतिक मंदिरात गेला.
वरील वाक्यात प्रतिक हा शब्द नाम आहे. प्रतिक हा मुलगा
आहे हे आपल्याला या नावावरून समजते. म्हणून प्रतिक या नामावरून पुरुष जातीचा (नर) बोध
होतो. यावरून असे म्हणता येईल प्रतिक हा
शब्द पुल्लिंगी आहे.
२. झाडाखाली गाय बांधली आहे.
वरील वाक्यात गाय हा शब्द नाम आहे.गाय या नामावरून स्त्री
जातीचा (मादी) बोध होतो. यावरून असे म्हणता येईल गाय हा शब्द स्त्रील्लिंगी आहे..
३. वासरू पांढऱ्या रंगाचे आहे.
वरील वाक्यात वासरू हा शब्द नाम आहे. म्हणून वासरू या
नामावरून पुरुष जातीचा (नर) किंवा स्त्री जातीचा (मादी) बोध होत नाही. यावरून असे
म्हणता येईल वासरू हा शब्द पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी नाही .अशा नामाला
नपुंसकलिंगी नाम म्हणतात.
हे लक्षात ठेवा –
नाम | सर्वनामाचा वापर करून उल्लेख | नामाचे लिंग |
---|---|---|
प्रतिक | तो - प्रतिक | पुल्लिंग |
गाय | ती - गाय | स्त्रीलिंग |
वासरू | ते - वासरू | नपुंसकलिंग |
👉ज्या नामावरुन पुरुष जातीचा बोध होतो,
ते पुल्लिंग असते.
👉ज्या नामावरुन स्त्री जातीचा बोध होतो,
ते स्त्रीलिंग असते.
👉ज्या नामावरुन पुरुष किंवा स्त्री जातीचा
बोध होत नाही, ते नपुंसकलिंग असते.
💥प्राण्यांतील स्त्रीचा किंवा मादीचा (स्त्रील्लिंग
नामाचा) उल्लेख ‘ती’ या सर्वनामाने केला जातो.
💥स्त्री किंवा पुरुष जातीचा बोध होत नसेल तर
(नपुंसकलिंगी नामाचा) उल्लेख ‘ते’ या सर्वनामाने केला जातो.
💥‘तो, ती, ते’ हे सर्वनामे लिंग ओळखण्यासाठी उपयोगी
पडतात.
💥एखाद्या नामाचे लिंग बदलल्यास वाक्यातील
क्रियापदाचे रूपही बदलते.
0 Comments