SQAAF Mahiti pustika SQAAF माहिती पुस्तिका
शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा
💥 School Quality Assessment and Assurance Framework (SQAAF) ही माहिती ऑनलाईन भरण्यासाठी
मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासंदर्भाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक
- १२/०३/२०२५ रोजीचे पत्र पहा .
SQAAF मुल्यांकन माहिती भरण्यासाठी उपयोगी असणाऱ्या लिंक.
👉SQAAF माहिती भरण्यासाठी उत्तम मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्यासाठी - Click Here
SQAAF Mahiti pustika SQAAF माहिती पुस्तिका
राष्ट्रीय शिक्षण धोरण
- २०२० ची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये सुरू झाली असून, त्यात अनेक मूलभूत घटकांचा समावेश करण्यात आला
आहे. एकविसाव्या शतकातील विदयार्थ्यांसाठी, त्यांच्या
शैक्षणिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक
अशा सर्वांगीण गरजा पूर्ण करणाऱ्या, देशातील सर्व शाळा आदर्श
शाळा असाव्यात. गुणवत्ता हा शिक्षणाचा गाभा असून, त्यासाठी
दर्जेदार शिक्षण देणे, हे शाळेच्या सुधारणांच्या माध्यमातूनच
होऊ शकते. प्रत्येक शाळेने मानकसंचाच्या आधारे सुधारणा करणे आवश्यक आहे. शाळेत
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, मूल्यांकन पद्धती, नेतृत्व व प्रशासन, शाळेत लागणारी संसाधने व त्यांची
उपलब्धता, उपयोगिता, शाळेतील शिक्षणाचा
दर्जा, शाळेतील शिक्षणप्रणाली व शाळेच्या संदर्भातील
निरीक्षणे यांत सातत्य असणे आवश्यक आहे, तसेच मूल्यांकन केले
जाणेही आवश्यक आहे.
१.
एकूण क्षेत्र किती ?
२.
एकूण मानके किती ?
३.
प्रत्येक मानकासाठी कोणते स्तर आहेत ?
४.
आपण निश्चित केलेल्या स्तरासाठी द्यावे लागणारे पुरावे कोणते ?
५.
पुराव्यासाठी लागणारे संदर्भ साहित्य कोणते ?
या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी शाळा
गुणवत्ता मुल्यांकन आणि आश्वासन आराखडा याची सविस्तर माहिती पुस्तिका उपलब्ध करून
दिलेली आहे. या माहिती पुस्तिकेत पान नंबर २१ पासून ते पान नंबर १३४ पर्यंत सर्व
क्षेत्र आणि त्यातील मानके तसेच प्रत्येक स्तरासाठी उपयुक्त पुरावे यासाठी सविस्तर
माहिती आपणास दिलेली आहे.
हे माहिती पुस्तक डाउनलोड करण्यासाठी खालील
बटनावर क्लिक करा.
![]() |
SQAAF BOOK |
0 Comments