Online TeacherTransfer
जिल्हा प.शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल उद्यापासून ACTIVE होणार
👉माननीय सीईओ आणि ईओ पोर्टलवर त्यांच्या लॉगिनवरून त्यांच्या जिल्ह्याचा नवीन शाळा आणि शिक्षकांचा डेटा जोडू शकतात. तसेच ते डेटा अपडेट आणि हटवू शकतात.
![]() |
Online TeacherTransfer |
शिक्षक जिल्हांतर्गत बदली बाबत.
संदर्भ: व्हिन्सीस मार्फत झालेली व्हिसी दिनांक 10.02.2025
👉वरील संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने तमाम शिक्षक बंधू भगिनी आपणास कळविण्यात येते की, प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होत आहे.
1) पहिल्या फेज मध्ये
ACTIVE SCHOOL
INACTIVE SCHOOL
ACTIVE TEACHER
INACTIVE TEACHER
NEW TEACHER ADDING
हे काम जिल्हास्तरावरून सुरू होणार आहे .
शिक्षक जिल्हांतर्गत बदलीपोर्टल लॉगीन
करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://ott.mahardd.com/
2) बदली पोर्टलवर ज्या शिक्षकांची प्रोफाईल पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या शिक्षकांना Read Only मोड मध्ये त्यांच्या प्रोफाईल मधील माहिती दिसनार आहे.
3) ज्या शिक्षकांच्या प्रोफाईल मध्ये अपडेशन करावयाचे आहे ते अपडेशन तालुकास्तरीय पडताळणी नंतर जिल्हास्तरावरून होणार आहे.
4) वरील काम संपल्यावर किंवा सोबतच सर्व शिक्षकांचे प्रोफाईल अपडेशन आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया तालुकास्तरावरून सुरू होण्याची शक्यता आहे.
दिनांक 30.12.2024 च्या पत्रातील सूचनेनुसार आपल्या स्तरावरील बदली माहितीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून दिनांक 10.02.2025 रोजी या कार्यालयात माहिती सादर करण्यासाठी आपणास अवगत करण्यात आले होते .
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली शासन परिपत्रक 7 एप्रिल 2021 शासन वेळापत्रकाप्रमाणे
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक-
दिनांक - ७ नोव्हेंबर, २०२४ प्रमाणे
➡️ संवर्ग १ बदली - २८ एप्रिल ते ३ मे २०२५
➡️ संवर्ग २ बदली - ४ मे ते ९ मे २०२५
➡️ संवर्ग ३ बदली - १० मे ते १५ मे २०२५
➡️ संवर्ग ४ बदली - १६ मे ते २१ मे २०२५
➡️ विस्थापित बदल्या - २२ मे ते २७ मे २०२५
➡️ अवघड क्षेत्रातील जागा भरणे - २८ मे ते ३१ मे २०२५
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण आणि वेळापत्रक जाहीर केले आहे. दिनांक १८ जून २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलद्वारे राबविली जाईल.
बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल तयार करणे/अद्ययावत करणे, पडताळणी करणे व त्यामध्ये दुरुस्ती करणे याबाबतची कार्यवाही दि.२८ फेब्रुवारी पर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे.
0 Comments