Ad Code

Responsive Advertisement

New Posts

6/recent/ticker-posts

FLN GR [ payabhut saksharata abhiyan gr] पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान शासन निर्णय

  पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाच्या (FLN) सर्वसमावेशक व प्रभावी अंमलबजावणीसाठी माता गटांना सहभागी करुन घेणेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६ मादाम कामा रोडहुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : २९ जून २०२२.


प्रस्तावना:-
     
     विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत. त्यांच्या सर्वागिण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. भारत सरकारच्या निपुण भारतप्रकल्पांतर्गत राज्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी सुरु आहे. स्टार्स प्रकल्पअंतर्गत इयत्ता पहिलीत येणाऱ्या मुलांसाठी 'पहिले पाऊल-शाळापूर्व तयारी अभियानदेखील राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात अथवा गावात मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी एप्रिल २०२२ आणि जून २०२२ मध्ये मेळावे आयोजित करण्यात आले होते. या दोन मेळाव्यां दरम्यान वाडी-वस्तीवर माता-पालकांचे गट तयार करून त्यांना साहित्य पुरविले आणि मार्गदर्शन केले गेले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदमहाराष्ट्र राज्यपुणे द्वारे प्राप्त आकडेवारी नुसार राज्यत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ६७,००० हुन अधिक प्राथमिक शाळांमध्ये शाळापूर्व तयारीचे मेळावे आयोजित करण्यात आले. ज्यात १४ लक्ष पेक्षा जास्त मुलं सहभागी झाली आणि त्यांच्या मातांचे जवळ जवळ २.५ लक्ष गट स्थापन झाले.
नुकतेच "प्रथम" संस्थेद्वारे करण्यात आलेल्या नमुना मूल्यांकनाद्वारे आणि पालकांकडून प्राप्त प्रतिक्रियांद्वारे ह्या मेळाव्यांचा आणि माता गटांचा सकारात्मक परिणाम मुलांच्या शाळापूर्व तयारी मध्ये झालेला दिसून आला आहे.


 

FLN GR [ payabhut saksharata abhiyan gr]  पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान शासन निर्णय 


Post a Comment

1 Comments

Ad Code

Responsive Advertisement