Ad Code

Responsive Advertisement

New Posts

6/recent/ticker-posts

Visheshan Marathi Grammar Adjective विशेषण मराठी व्याकरण

 

विशेषण

Visheshan Marathi Grammar Adjective 

Visheshan Marathi Grammar Adjective 

 नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. 

उदा. चांगली मुलगी काळा कुत्रा पाच टोप्या विशेषण चांगली, काळा, पाच विशेष्य पिशवी, कुत्रा, टोप्या 

विशेषणाचे प्रकार : गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण 

१. गुणवाचक विशेषण : नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण असे म्हणतात. उदा. हिरवे रान शुभ्र ससा निळे आकाश 

२. संख्या विशेषण : ज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास संख्या विशेषण असे म्हणतात. संख्या विशेषणाचे पाच प्रकार आहेत. 

२.१ गणना वाचक संख्या विशेषण

२.२ क्रम वाचक संख्या विशेषण 

२.३ आवृत्ती वाचक संख्या विशेषण 

२.४ पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण 

२.५ अनिश्चित संख्या विशेषण 

२.१. गणना वाचक संख्या विशेषण : ज्या विशेषणाचा उपयोग वस्तूची गणती किंवा गणना करण्यासाठी होतो त्या विशेषणाला गणनावाचक विशेषण असे म्हणतात उदा. दहा मुले तेरा भाषा एक तास पन्नास रुपये 

गणना वाचक संख्या विशेषणाचे तीन प्रकार पडतात. 

1. पूर्णाक वाचक पाच, सहा, अठरा, बारा. 

2. अपूर्णाक वाचक पावशेर, अर्धा, सव्वा, दीड. 

3. साकल्य वाचक पाचही मैत्रिणी, दोन भाऊ. 

 

२.२. क्रमवाचक संख्या विशेषण : वाक्यामधील जे विशेषण वस्तूचा क्रम दर्शविते त्या विशेषणाला क्रमवाचक विशेषण असे म्हणतात. उदा. पहिल दुकान सातवा बंगला पाचवे वर्ष. 

२.३. आवृत्ती वाचक संख्या विशेषण : वाक्यामधील जे विशेषण संख्येची किती वेळा आवृत्ती झाली ते दर्शविते त्यास आवृत्तिवाचक विशेषण असे म्हणतात. उदा. तिप्पट मुले दुप्पट रस्ता दुहेरी रंग. 

२.४. पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण : जी विशेषणे पृथ्वकत्व म्हणजे वेगळा बोध करून देतात त्यांना पृथ्वकत्व वाचक संख्या विशेषण असे म्हणतात. उदा. मुलींनी पाच-पाच चा गट करा प्रत्येकाने चार-चार प्रश्न सोडवा. 

२.५. अनिश्चित संख्या विशेषण : ज्या विशेषणाव्दारे नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही अशा विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण असे म्हणतात. उदा. काही मुले थोडी जागा भरपूर पाणी. 

3. सार्वनामिक विशेषण : सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. 

उदा. हे झाड ती मुलगी तो पक्षी मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे अशावेळी नेहमीच मूळ स्वरुपात न येता सर्वनामास विभक्तीची प्रत्यय लागून त्यांच्या रूपात पुढील प्रमाणे बदल होतो. 

मी माझा, माझी, तू तुझा, तो-त्याचा आम्ही आमचा, तुम्ही-तुमचा, ती-तिचा हा असा, असला, इतका, एवढा, अमका तो तसा, तसला, तितका, तेवढा, तमका जो जसा, जसला, जितका, जेवढा कोण कोणता, केवढा जे शब्द नामांबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना विशेषणे असे म्हणतात. 

उदा. गोड, कडू, दहा, त्याचा, इ. 

 

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement