राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF 2020)
![]() |
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF 2020) |
आधीच्या पोस्ट वाचा.👇
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० मध्ये देशातील शालेय शिक्षणपद्धतीत बदल करण्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF) व राज्य अभ्यासक्रम आराखडा (SCF) विकसित करण्यात येत आहे. हे राज्यांच्या सक्षमीकरणाशी सुसंगत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मूळ उद्देश संपूर्ण देशातील अभ्यासक्रमात सुसंवाद, सलोखा व एकसूत्रीपणा आणणे हा आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF 2020) Click Here
💥यासाठी शैक्षणिकदृष्ट्या मजबूत आणि व्यावहारिकदृष्ट्या अंमलबजावणी योग्य असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा विकसित करणे गरजेचे आहे. यामुळे प्रत्येक विदयार्थ्याला सर्वोत्तम शिक्षण मिळेल व विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल.
💥चारित्र्यवान, निरोगी, नैतिक, सर्जनशील, संवेदनशील व्यक्ती घडविणारे, तसेच उच्च शिक्षणाशी सुसंगत आणि विदयार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारे शिक्षण हे नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रमाचे ध्येय असले पाहिजे. या शिक्षण प्रणालीत घडलेले विद्यार्थी सतत नवे ज्ञान मिळवणारे व बदलत्या काळाशी जुळवून घेण्याची क्षमता असलेले बनतील. नव्या अभ्यासक्रमामुळे सांस्कृतिक, आर्थिक व लोकशाही मार्गांनी समाजात सहभागी होण्यासाठी विदयार्थ्यांना सक्षम व प्रेरित केले जावे.
💥भारतीय समाजाचे रूपांतर अधिक न्याय्य, समतावादी, मानवतावादी, शाश्वत, भारतीय संस्कृतीचा अभिमान असलेल्या समाजात करणे हे नव्या अभ्यासक्रमाचे ध्येय असले पाहिजे. आर्थिक विकास, सामाजिक न्याय व समता, संशोधन व ज्ञाननिर्मिती, वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती, पर्यावरणीय शाश्वतता, संस्कृतीचे जतन व संवर्धन आणि चैतन्य अशा सर्व बाबतीत जागतिक पातळीवर भारताची कमान चढती राखणारे सक्षम नेतृत्व निर्माण झाले पाहिजे. शाळेत शिकवला जाणारा आशय, शाळेतील वातावरण आणि अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी वर नमूद केलेल्या वैयक्तिक आणि सामाजिक उद्दिष्टांना स्पष्टपणे प्रोत्साहन देणारी असली पाहिजे.
0 Comments