Ad Code

Responsive Advertisement

New Posts

6/recent/ticker-posts

मराठी म्हणी Marathi Mhani Marathi Grammar

 

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ 



मराठी म्हणी

1.   पळसाला पाने तीनच कोठेही गेलं तरी परिस्थिती तीच असणे .

2.   नाचता येईना अंगण वाकड आपल्यातील उणीवा झाकण्यासाठी  दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे .

3.  ताकाला जाऊन भांड लपवू नये एखादी गोष्ट आपणास हवी असल्यास ती स्पष्टपणे मागावी .

4.   लहान तोंडी मोठा घास लहान माणसाने मोठ्याला उपदेश करणे .

5.   हातच्या काकणाला आरसा कशाला समोर दिसणारी गोष्ट पाहण्यासाठी आरसा वापरण्याची गरज नाही .

6.  दिव्याखाली अंधार -कितीही सद्गुणी माणूस असला तरी त्याच्यात एखादा दुर्गुण असतोच .

7.   गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाचा गर्व कधीही नाहीसा होतो .

8.   एक ना धड भाराभर चिंध्या सर्व कामे अर्धवट ठेवल्यामुळे एकही काम पूर्ण होत नाही .

9.    आयत्या बिळात नागोबा दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे .

10.  वासरात लंगडी गाय शहाणी अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते .

11.  माकडाच्या हाती कोलीत मुर्खाला नको ते अधिकार देणे .

12.  पाण्यात राहून माशाशी वैर करू नये जेथे राहायचे तेथील माणसांशी वैर करू नये .

13.  अति तेथे माती कोणत्याही गोष्टीच अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो .

14.  अंथरून पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मानाने खर्च करावा .

15.  आधी पोटोबा मग विठोबा आधी स्वार्थ मग परमार्थ .

16. अति शहाणा त्याचा बैल रिकामा स्वतःला शहाणा समाजनाऱ्याकडून काहीच काम होत नाही .

17. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे किमान लाभाची अपेक्षा केली असता , अपेक्षेपेक्षा  अधिक लाभ होणे .

18. अडला हरी गाढवाचे पाय धरी शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते .

19. आलीय भोगासी असावे सादर जे नशीब असेल ते भोगायला तयार राहणे .

20. आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते एकाच्या कष्टाचा दुसऱ्याने फायदा  घेणे.

मराठी म्हणी

21.  आवळा देऊन कोहळा काढणे क्षुल्लक गोष्टीच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे .

22.  ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये एखादी वस्तू आवडली म्हणून तिचा अतिलोभ बाळगू नये .

23. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उतावळेपणाने मुर्खासारखे वर्तन .

24. उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी गुण थोडे असताना ते अधिक असल्याचे प्रदर्शन करणे .

25. लेकी बोले सुने लागे एकाल उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे  बोलणे.

26. कामापुरता मामा स्वार्थापोटी गोड बोलणारा मतलबी माणूस .

27. कोळसा उगळावा तितका काळाच दुष्ट माणसाबद्दल अधिक विचार केला असता त्याची अधिक दुष्कृत्य उघड होणे .

28. नावडतीचे मीठ अळणी नावडत्या माणसाने केलील गोष्ट वाईटच वाटते .

29. ताकापुरती आजी स्वार्थ साधण्यासाठी एखाद्याची स्तुती करणे .

30. बैल गेला नि झोप केला एखादी गोष्ट टाळून गेल्यावर त्यासाठी  केलेली व्यवस्था व्यर्थ ठरणे .

31. बुडत्याचा पाय खोलात माणसाची अवनती होऊ लागली की ती सर्व  बाजूंनी होते .

32. पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे .

33. भिक नको पण कुत्रा आवर ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता , उलट संकट ओढवणे .

34. डोळ्यात केर कानात फुंकर भलत्याच ठिकाणी उपाय करणे .

35. कानामागून आली नि तिखट झाली नंतर येणाऱ्याचा थाट वाढणे .

36. कोल्हा काकडीला राजी क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीने संतुष्ट होतात .

37. खाण तशी माती आईवडिलांचे गुणावगुण पुढील पिढीमध्ये आढळणे .

38. घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे .

39. चोराच्या मनात चांदणे आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती असणे .

40. खाई त्याला खवखवे जो दुष्य्कृत्य करतो त्याच्या मनात भीत असते .

41. नाकापेक्षा मोती जड कमी दर्जाच्या मानसाला अधिक महत्व येणे .

42. पुढच्यास ठेच मागचा शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यातून धडा शिकणे .

43. देश तसा वेश परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागणे .

44. खायला काळ भुईला भार निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो .

45. भित्यापाठी ब्रम्हराक्षस भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात .

46. सरड्याची धाव कुंपणापर्यंत सामान्य कुवतीच्या माणसाची भेट विशिष्ट मर्यादेपर्यंत असणे .

47.  शितावरून भाताची परीक्षा एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपर्ण वस्तूची परीक्षा करणे .

48. विनाशकाले विपरीत बुद्धी विनाशकाल आला की माणसाची बुद्धी फिरते .

49. आधीच तारे त्यात शिरले वारे आधीच इच्छा नसताना नकारार्थी गोष्ट घडणे .

50. साखरेचे खाणार त्याला देव देणार भाग्यवानाला सर्व परिस्थिती अनुकूल असते .   

 

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement